MI vs RR : आज मुंबई इंडियन्स अन् राजस्थान रॉयल्स भिडणार! कोण मारणार बाजी?

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सुरुवात अत्यंत निराशाजनक झालीय. मुंबईला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे मुंबईवर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचं आव्हान आणि दडपण आहे. मुंबई या हंगामातील आपला तिसरा सामना दोन्ही सामने जिंकलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध 1 एप्रिल रोजी खेळणार आहे. मुंबई हा सामना घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे.

हा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. कॅप्टन हार्दिक पहिल्या विजयासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करु शकतो.हार्दिक लोकल बॉय शम्स मुलानी याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. तसेच 17 वर्षीय क्वेन मफाका याला डच्चू देऊ शकतो. तर हार्दिक या दोघांच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये डेवाल्ड ब्रेव्हीस आणि रोमरिया शेफर्ड/ल्यूक वूड यांना संधी मिळू शकते. क्वेन याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केलं होतं.

मात्र मफाका पहिल्या सामन्यातच अपयशी ठरला. मफाका याने खोऱ्याने धावा लुटवल्या. मफाका याने 4 ओव्हरमध्ये 66 धावा दिल्या. तसेच हार्दिक आकाश मधवाल याचाही विचार करु शकतो. आकाशने गेल्या हंगामात मुंबईसाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

मुंबई इंडियंसची संभावित प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेविड, डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्जी, रोमारियो शेफर्ड, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.

इम्पॅक्ट प्लेयर: आकाश मधवाल.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (W/C), रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, केशव महाराज , टॉम कोहलर-कॅडमोर, रोव्हमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, कुणाल सिंग राठौर