बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्यापासून जुलै (July) महिना सुरु होणार आहे. या जुलैमध्ये बँकांना (Banks) भरपूर सुट्ट्या राहणार आहेत. जुलैमध्ये बँकांना 12 दिवस सुट्टी राहणार आहे. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्यांनी यादी पाहूणच बँकेतील कामाचं नियोजन करावं.
बँका ही एक महत्त्वाची वित्तीय संस्था आहे. बँकेत अनेकांची महत्त्वाची कामे असतात. सुट्टी असल्यामुळं अनेकांची कामं रखडतात. धनादेश जमा करण्यापासून ते एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत रोखीच्या व्यवहारांसाठी बँकेत जावे लागते. पण बँक बंद राहिल्यास ग्राहकांचा वेळ वाया जातो. अशा समस्या टाळण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपूर्वी बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. जुलैमध्ये येणाऱ्या सुट्ट्यांची माहितीही आरबीआयने दिली आहे. ही यादी पाहून तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करू शकता.
जुलैच्या 31 दिवसांपैकी एकूण 12 दिवस बँकांना सुट्टी असेल. यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि दर रविवारी सुट्टीचाही समावेश आहे. याशिवाय राज्यांमध्ये स्थानिक सण आणि मोहरममुळे बँकाही बंद राहणार आहेत.
बेह दीनखलम सणानिमित्त शिलाँगमध्ये 3 जुलै 2024 रोजी बँकेला सुट्टी असेल.
एमएचआयपी दिनानिमित्त 6 जुलै 2024 रोजी आयझॉलमधील बँकांना सुट्टी असणार.
रविवार, 7 जुलै 2024
8 जुलै 2024 रोजी कांग रथयात्रेनिमित्त इंफाळमधील बँका बंद राहतील
9 जुलै 2024 रोजी द्रुकपा त्से-जीच्या निमित्ताने गंगटोकमध्ये बँकेला सुट्टी असेल
13 जुलै 2024 रोजी दुसरा शनिवार
14 जुलै 2024 रविवार सुट्टी
डेहराडूनमधील बँका 16 जुलै 2024 रोजी हरेलाच्या निमित्ताने बंद राहणार आहेत.
17 जुलै रोजी मोहरमच्या निमित्ताने अहमदाबाद, पणजी, भुवनेश्वर, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोची, कोहिमा आणि त्रिवेंद्रम वगळता संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
21 जुलै 2024 रोजी रविवारची सुट्टी
27 जुलै 2024 रोजी चौथ्या शनिवारची सुट्टी
28 जुलै 2024 रोजी रविवारची सुट्टी