शारदीय नवरात्र सुरू झाली आहे. अशात अनेकजण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. सध्या देशात सर्वत्र देवीच्या भक्तीचे वारे वाहत आहेत. अशात अनेक भक्त मातेला प्रसन्न करण्यासाठी 9 दिवसांचे उपवास पाळतात. जर तुम्हीही उपवास करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेलच, सोबत भूकही लागणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदार्थामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करेल. जाणून घ्या…
हाय प्रोटीन रेसिपीची ‘अशी’ तयारी करा
ही हाय प्रोटीन रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला मखाणा, दही, चिया बिया, मनुका, डाळिंब, शेंगदाणे, सफरचंद आणि वेलची पावडर लागेल. एका मोठ्या भांड्यात एक कप दही घ्या. एक वाटी भाजलेले मखाणा, एक चमचा भिजवलेले चिया सीड्रस, 8 ते 10 सोनेरी मनुके, अर्धी वाटी डाळिंब, अर्धी सफरचंद, एक चमचा वेलची पूड आणि थोडे भिजवलेले शेंगदाणे घाला. सर्वकाही एकत्र मिसळा. तुमची हाय प्रोटीन फास्टिंग रेसिपी तयार आहे.
मखाणा हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. यासोबतच ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड्सही मुबलक प्रमाणात मिळतात. उपवासाच्या वेळी मखाणा वेगळेही खाता येतात.
दह्यापासून शरीराला प्रोबायोटिक्स चांगल्या प्रमाणात मिळतात. दही पचनासाठीही उत्तम आहे. उपवासाच्या वेळी साधं दही खाऊ शकता, साखर किंवा दही असं एकत्र मिश्रणही खाऊ शकता.
चिया सीड्सना पोषक तत्वांचे पॉवरहाऊस म्हणतात. कारण त्यात प्रथिनाशिवाय फायबरही मुबलक प्रमाणात असते. फायबरचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि उपवासात पुन्हा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही