जुलै महिन्याच्या या तारखेपासून वाढणार महाराष्ट्रात पावसाचा जोर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठा लोकप्रिय आहे.हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा पंजाबरावांच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाब रावांचे हवामान अंदाज तंतोतंत खरे ठरतात आणि यामुळे त्यांना शेतीमध्ये मोठी मदत होते. परिणामी, पंजाबरावांच्या हवामान अंदाजाकडे शेतकऱ्यांचे मोठे बारीक लक्ष असते. पंजाब रावांच्या हवामान अंदाजाबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.

दरम्यान आता पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. या नवीन हवामान अंदाजात त्यांनी जुलै महिन्यात पावसाचा जोर कधी वाढणार याबाबत माहिती दिली आहे. खरंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मध्यंतरी पावसाचा मोठा खंड पडला होता आणि त्यानंतर अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात अजूनही पावसाचा जोर थोडासा कमी आहे.

यामुळे शेतकरी बांधव जोरदार पावसाला कधी सुरुवात होणार? असा सवाल उपस्थित करत आहेत. पंजाबरावांच्या मते महाराष्ट्रात आज 30 जून रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. या कालावधीत राज्याच्या पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागात भाग बदलत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या कालावधीत राज्यातील वाशिम, वर्धा, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, परभणी, जळगाव, जालना, बीड, नाशिक, धुळे, अहमदनगर, कोकण, नंदुरबार या भागात पावसाची तीव्रता थोडीशी जास्त राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागातही पाऊस पडणार आहे.

मात्र या भागात पावसाचा जोर थोडा कमी राहील अशी शक्यता आहे. दुसरीकडे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चार जुलै नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो असे म्हटले जात आहे.

निश्चितच, ज्या भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागात जर या कालावधीत चांगला जोराचा पाऊस पडला तर तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा मोठा दिलासा मिळेल आणि पिकांची चांगली जोरदार वाढ होईल अशी आशा आहे.