विनय कोरे वाढवणार महायुतीची डोकेदुखी…..

सध्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आपापली इच्छा, मत व्यक्त केले आहेत. कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. महायुतीचे सहयोगी जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांनी महायुतीला मास्टर स्ट्रोक दिला आहे. आज मुंबई येथे बोलताना त्यांनी महायुतीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि राज्यात इतर ठिकाणी आठ जागांची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी महायुतीला मास्टर स्ट्रोक दिला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरे यांच्या या विधानाकडे कसे पाहतात हे औत्सुक्याचा विषय आहे. मुंबई येथे बोलताना जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी आपली भूमिका मांडली. आपल्याला राज्यात 12 ते 15 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. लवकरच महायुतीतील नेत्यांकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती कोरे यांनी दिली. दरम्यान कोरे यांचे होम ग्राउंड असलेले पन्हाळा- शाहूवाडी, हातकणंगले, चंदगड पारंपारिक जागा आपल्याकडे ठेवत विधानसभा मतदारसंघावर कोरे यांच्याकडून दावा केला जाऊ शकतो.