विळ्याने वार करून पत्नीचा निर्घृण खून!

अलीकडे खून, हाणामारी, तसेच चोरीच्या प्रकरणे खूपच वाढत आहेत. अश्यातच कोल्हापूर मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. कौटुंबिक वादातून पतीने मानेवर विळ्याने वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. सोमवारी (दि. २५) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नूल (ता. गडहिंग्लज) येथील हिटणी वसाहतीमध्ये ही घटना घडली.सुशीला मारूती बेळाज (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून, संशयित पती मारुती शिवाप्पा बेळाज (वय ६०) हा फरार झाला आहे. गडहिंग्लज पोलिसांकडून घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. तपासात मारुती याचा शोध घेतला जात आहे.