मा. आमदार दीपकआबा पाटील यांची महिलांना अनोखी भेट!

राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील मुली व महिलांना दरमहा रु.1500/- आर्थिक लाभ डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहेत. त्यासाठीचे ऑनलाईन ऑफलाइन अर्ज आजपासून भरणे सुरू झालेले आहे.

सांगोला तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले आहे. शासकीय कार्यालयातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मोफत देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. मात्र खाजगी सेतू कार्यालय आणि महा-ई-सेवा केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेचा अर्ज भरण्यासाठी प्रत्येक फॉर्मसाठी प्रत्येकी 50 रुपये इतका शुल्क आकारण्यात येणार आहे.

सांगोला शहरातील आणि तालुक्यातील सर्व सेतू कार्यालय आणि महा-ई-सेवा केंद्र महिलांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी किंवा या योजनेचा अर्ज भरण्यासाठी येणारा प्रत्येकी पन्नास रुपयांचा खर्च दीपक आबा साळुंखे करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणींना आगळीवेगळी भेट दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे.

सांगोला तालुक्यातील सर्व सेतू चालक आणि महा-ई-सेवा केंद्रांना याबाबत माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील सूचना देणार आहेत सर्व महिलांचा खर्च स्वतः देणार असल्याचे आबांनी जाहीर केले आहे तसेच याबाबत महिलांना कोणतीही अडचण असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क करावा असे देखील दीपक आबांनी सांगितले आहे