वैभवदादा पाटील यांचे खानापूर मतदार संघात विशेष लक्ष….

गावागावात अनेक विकास कामांसाठी नेतेमंडळींकडून निधी मंजूर करून गावामध्ये विकासकामे केली जातात. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव दादा पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून अजितदादांच्या माध्यमातून मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. खासकरून खानापूर मतदारसंघात वैभवदादा पाटील यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. अशा मध्येच विटा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक चार अर्थात मूळ स्थान गुंफा येथील लोकांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव दादा पाटील धावून गेलेले आहेत.

माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली विकास कामे तसेच वैभव दादांनी पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेण्यासाठी यंत्रणा हाती घेतलेली आहे. गुंफा परिसरातील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण तसेच बंदिस्त पाईपलाईन टाकने अशा राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी वैभव दादा पाटील यांनी परिसरातील लोकांच्या समस्या, अडीअडचणी प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात परिसरातील लोकांचे प्रश्न तातडीने सोडवू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे.