दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचा गुलाल!

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभानिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी म्हणजेच 4 जून रोजी होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार असून जिल्हा प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे.इतर सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर लोकसभेची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावड्यात होणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदाम इमारत, राजाराम तलाव, कोल्हापूर याठिकाणी होणार आहे. तयारीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही ठिकाणी सोमवारी भेट देत घेतला. कोल्हापुरात शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. हातकणंगलेत राजू शेट्टी, सत्यजित पाटील आणि धैर्यशील मानेंमध्ये तिरंगी लढत होत आहे. सर्वच उमेदवारांकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अंतिम चित्र 4 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.