आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत(Maharashtra Legislative Council Election)क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे.
गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावल्याने 12 पैकी कोण पराभूत होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. त्यामुळे आमदार त्यांची दुसरी आणि तिसरी पसंत कुणाला देतात हे देखील महत्त्वाचं असेल.
विधानपरिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत. ही निवडणूक देखील त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोणत्या एका उमेदवाराचा पराभव होणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.