डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी घोषणा……

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध होत आहे.मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आपल्या या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते, मंगळवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान राज्यभर शांतता जागृती रॅली काढणार आहेत. आपल्या दौऱ्याची सुरवात ते विदर्भातून करणार आहेत.

तर दुसरीकडे ओबीसी समाजासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे अभिवादन दौरा करणार आहेत. ते या दौऱ्याची सुरुवात सिंदखेड राजा येथून करणार असून. भगवान गड, गोपीनाथ गड असा तीन दिवसांचा अभिवादन दौरा ते करणार आहेत.