गेल्या अनेक दिवसांपासून सगळीकडे ‘पुष्पा २’ चीच हवा पाहायला मिळतेय. रिलीजच्या आधीच या सिनेमाने इतकं वातावरण तापवलं होतं की चित्रपट रिलीज होताच ‘पुष्पा २’ ने अनेक रेकॉर्ड्स मोडले आणि नवे बनवलेही.
अशातच पुष्पा स्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आणि या घटनेला नवं वळण मिळालं.’पुष्पा 2′ च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली होती. यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्याच दिवशी त्याला जामीनही मंजूर झाला.
या सर्व नाट्यपूर्ण घडामोडींनंतर ‘पुष्पा २’ च्या कमाईच्या आकड्यांवर परिणाम होईल असे वाटत असतानाच या चित्रपटाने ८०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रूल’ ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे.
‘पुष्पा 2: द रूल’ने नवव्या दिवशी 36.4 कोटींची कमाई केली होती, तर आता 10व्या दिवशी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली आहे.जगभरात देखील ‘पुष्पा 2: द रूल’ भरपूर कमाई करत आहे. अवघ्या 9 दिवसांत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1105.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
भारतात या चित्रपटाने ‘RRR’ला मागे टाकले असले तरी जगभरातील कलेक्शनचा विचार करता अल्लू अर्जुनचा चित्रपट हा आकडा पार करण्यापासून दूर आहे. ‘RRR’ने जगभरात एकूण 1230 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.