पावसाळयात होणारे आजार, त्याची लक्षणे आणि त्यावरील उपाय सर्वकाही एकाच क्लिकवर👇👇

पावसामुळे आपणाला गरमीपासून दिलासा मिळतो खरा पण पावसामुळे अनेक आजारांना आमंत्रण सुद्धा मिळत असते. विशेष करून पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक असते. या दिवसात डेंगू, मलेरिया, कॉलरा, अतिसार, सर्दी, खोकला असे आजार उदभवतात.

त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आरोग्याची काळजी घेताना पावसाळयातील आजार त्याची लक्षणे आणि त्यावरील उपाय तुम्हाला माहीत असायला हवेत.

डेंग्यू

पावसाळ्यात सर्वात सामान्य आजार म्हणजे डेंग्यू. एडिस नावाच्या डासाच्या चावामुळे डेंग्यू आजार होतो. तुम्हाला डेंग्यू झाल्यास तीव्र ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, थकवा येणे अशी लक्षणे दिसतात. हा आजार लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वानाच असतो. विशेष करून मुलांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त दिसते. यावर उपाय म्हणजे डेंग्यू झालेल्या रुग्णाला बेडरेस्ट द्यावी. तसेच डॉक्टरच्या सल्य्याने औषधे सुरु करावीत. जास्तीत जास्त द्रव पदार्थ द्यावेत. यात तुम्ही फळांचा रस देऊ शकता.

मलेरिया

मलेरिया हा पावसाळ्यातील एक आजार आहे. यात तुम्हाला सर्वप्रथम कडाक्याची थंडी जाणवते. त्यानंतर तीव्र ताप आणि डोकेदुखी जाणवते. अशक्तपण, पोटदुखी, अतिसार, उलट्या, अस्वथपणा जाणवतो. मलेरियापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस नाही.

त्यामुळे डासांपासून स्वतःचे लक्षण करणे उत्तम ठरते. यासाठी तुम्ही झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. तसेच डास दूर ठेवण्यासाठी तुम्ही शरीराला कडुलिंबाचे तेल किंवा मोहरीचे तेल लावू शकता.

टायफॉईड

टायफॉईड हा पावसाळयातील संसर्गजन्य आजार आहे. हा आजार दूषित अन्नपदार्थ खाल्याने आणि पाणी पिण्यामुळे होतो. दीर्घकाळ ताप, अशक्तपणा, पोटदुखी, बद्धकोष्टता, डोकेदुखी आणि उलट्या ही टायफॉईडची लक्षणे आहेत.

वायरल फिवर

खरं तर , वायरल फिवर कोणत्याही ऋतूत होऊ शकतो. असे असले तरी वायरल फीव्हरचे रुग्ण पावसाळ्यात अधिक दिसून येतात. वायरल फीव्हरमुळे ताप , थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा, कडाक्याची थंडी वाजणे अशी लक्षणे दिसू शकतात.

डायरिया

पावसाळ्यात लहान मुलांमध्ये डायरियाचे प्रमाण अधिक दिसून येते. डायरियाची लक्षणे म्हणजे पोटात क्रम्प्स, सूज, मळमळ, अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात मुलांना बाहेरचे अन्नपदार्थ देऊ नये. पावसाळ्यात मुलांचा आहार हा सकसच असायला हवा.

हे आजार कसे टाळायचे

सर्वप्रथम आहाराची काळजी घ्यावी.मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. स्ट्रीट फूड खाऊ नये. घरगुती जेवण करावे. स्वतःला हायड्रेट ठेवावे तसेच भरपूर पाणी सुद्धा प्यावे.पावसाळ्यात घरातील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.