टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे.
याचदरम्यान एका तरुणीनं हार्दिक पांड्यासोबत सोशल मीडियावर फोटो टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. हार्दिक पांड्यासोबत फोटो काढल्यामुळे व्हायरल झालेली मुलगी एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचे नाम प्राची सोलंकी असे आहे. प्राची हार्दिकची चाहती असल्याने तिने त्याच्यासोबत फोटोशूट केले. तिने स्वत: हार्दिकसोबतचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. पांड्या कुटुंबियांचे आणि प्राची यांचे चांगले संबंध असल्याचे दिसून येत आहे.
नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट झालाच तर हार्दिकची किती संपत्ती नताशाला मिळणार? असंही विचारलं जातंय. या दाम्पत्याचा घटस्फोट होणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. हार्दिक आणि नताशा या दोघांनीदेखील यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.