गणेशोत्सव होणार गोड! सरकारकडून या दिवशी मिळणार आनंदाचा शिधा…..

राज्यातील नागरिकांसाठी गौरी-गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा मिळणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव गोड होणार असून यासासाठी ५६२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे अवघ्या १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यावेळी द्रारिद्य्ररेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा नागरिकांना एक किलो चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा  शिधा देण्यात येणार आहे.

लाेकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद करण्यात आला होता. आता गणेशोत्सवाच्या काळात तो पुन्हा सुरु करण्यात येत असून यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मतांच्या पेरणीसाठी आनंदाचा शिधा वाटप करत असल्याची टीका करण्यात आली होती.