विसर्जन मिरवणुकीत मूर्तीच्या डेकोरेशनला आग! अनर्थ टळला

पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये मूर्ती विराजमान असलेल्या रथाच्या मागच्या बाजूला अचानक आग लागली होती. स्वयंसेवकांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आली.पुण्यातल्या गणपती चौक मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

गणपती चौक मित्र मंडळाच्या डेकोरेशनला फटाक्यांमुळे आग लागली. तिथे उभ्या स्वयंसेवकांनी तातडीने ही आग विझवली. त्यामुळे अनर्थ टळला.पुण्यासह मुंबईमध्ये गणपती विसर्जनाची धूम सुरु आहे. पुण्यातला पहिला मानाचा कसबा गणपती आणि दुसरा तांबडी जोगेश्वरी या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे.