मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नव्याने पाच मोठे बदल!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी येत्या 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये महिना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.दरम्यान, महिलांना अर्ज करणे सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकानरे अनेकवेळा अटी आणि शर्ती बदलल्या आहेत. असे असतानाच आता सरकारने नुकताच एक नवा जीआर काढला आहे. या नव्या निर्णयाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे आणि मोठे बदल करण्यात आले आहेत.

बदलले पाच नियम कोणते आहेत?

1) बदललेला पहिला नियम हा रेशन कार्डसंदर्भात आहे. नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

2) परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.

3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.

4) तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

5) आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भआगातील बालवाडी सेविका, अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती, आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात.