इचलकरंजीतील पाणीप्रश्न सोडवा….

पाणीप्रश्न न सोडविल्यास आवाडेंनी निवडणुक लढवू नये या आजी-माजी आमदारांना इचलकरंजीचे प्रश्न सोडवता येत नाही. अनेक वर्षे मंत्री पदे आमदार होऊन सुध्दा इचलकरंजीकरांना पाणी दिले नाही. वस्त्रद्योगाचे प्रश्न सोडवले नाहीत. इचलकरंजीत रेल्वे आणली नाही. बलोद्योगासाठी योजना आपल्या नाहीत. हे सर्व संपविण्यासाठी आता मात्र आजी-माजी आमदार तालुका आणि जिल्ह्याचा मुद्दा घेऊन नागरिकांना भुरळ घालत आहेत.

इचलकरंजीला पाणी द्या. तेथील वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडवा हे जमत नसल तर आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर या दोघांनीही येणारी निवडणूक लढवू नका. मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत आघव-पुणकीकर यांनी हळवणकर यांच्या इचलकरंजी जिल्हा मुद्यावर पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर म्हटले तर शाहू महाराज, कुस्ती, गुळ, कोल्हापुरी चप्पल, श्री अंबाबाई, जोतिबा असे अनेक तीर्थक्षेत्र,यामुळे जगभरात ओळख आहे. इचलकरंजी जिल्हा करण्यासाठी कोणतीही भौगोलिक रचना नाही. असे असताना आमदार आवाडे यांनी तालुक्याची मनापी केल्यानंतर हाळवणकर यांनी जिल्ह्याचा मागणी केली आहे.