कवठेमहांकाळ सध्या विधानसभा रोहित पाटील निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. आबांच्या याबरोबर कुस्ती कोणाची लागणार याकडे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे
प्रभाकर पाटील राजवर्धन घोरपडे लक्ष लागले आहे.
परंतु, विरोधी पक्षातून माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील व माजीमंत्री अजितराव घोरपडे यांचे पूत्र राजवर्धन घोरपडे यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.कवठेमहांकाळ येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रोहित पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
‘कोणीही पैलवान येऊ दे..’ असे आव्हान माजी खासदार संजय पाटील व युवा नेते प्रभाकर पाटील यांचे नाव न घेता पाटील यांनी दिले.कवठेमहांकाळ तालुक्यात राजवर्धन घोरपडे यांचे फोटो लावून त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘लोकसभा तो झाकी है, विधानसभा तो बाकी है’ असा फलक शहरामध्ये लावला होता. विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. परंतु डिजिटल फलक अजूनही लावलेला दिसून येत आहे, पण राजवर्धन घोरपडे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. विधानसभेसाठी रोहित पाटील, प्रभाकर पाटील व राजवर्धन घोरपडे या तीन युवा नेत्यांची मुख्य लढत होण्याचे संकेत आहेत.