सांगोला तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज सोबत खुला प्रवर्ग व मागास कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षण कामासाठी प्रगनकांना मराठा समाज प्रति कुटुंबासाठी शंभर रुपये तर कुटुंबासाठी दहा रुपये प्रमाणे मानधन व 500 रुपये प्रशिक्षण भक्ता देण्यात येणार होता. या मानधनाच्या भरोशावर सांगोला तालुक्यातील 270 प्रगनक यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला.
भर उन्हात योग्य माहिती जमा करून शासन स्तरावर जमा केले. दरम्यान तीस सुपरवायझर यांनी यांच्याकडून ते काम करून घेतले. परंतु या सर्व केलेल्या कामाचे मानधन अद्याप मिळालेले नसल्याने प्रगनक यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मानधन मिळावे तसेच थेट बँक खात्यात मानधन जमा करावे अशी मागणी देखील करण्यात आलेली होती.
दरम्यान सुपरवायझर यांचे मानधन जमा झाले. परंतु प्रत्यक्षात कामावर असणाऱ्या प्रगनक यांचे मानधन मागील सहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष घालून प्रगनकांना त्यांचे मानधन त्वरित मिळावे अशी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे.