सांगोला पोलिसांनी पार पाडली दमदार कामगिरी! गहाळ झालेले ३६ लाखांचे मोबाईल केले परत

दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या अनेक मौल्यवान साहित्यांवर डल्ला मारला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असताना सांगोला पोलिसांनी दमदार कामगिरी पार पाडली आहे. सांगोला पोलिसांनी वर्षभरात ३६ लाख २९ हजार रुपये किमतीचे एकूण १४५ साधे व महागडे गहाळ झालेल्या मोबाईल संचचा तपास लावून ज्यांचे मोबाईल संच हरवले त्यांना दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी दिली. सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत १ जानेवारी २४ ते ३० डिसेंबर २४ दरम्यान मोबाईल गहाळच्या अनेक घटना घडल्या होत्या. पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी यंत्रणा लावली होती.

दैनंदिन कामासोबतच हरवलेले मोबाईल शोधणे सुरू ठेवले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोबाईलचा शोध घेऊन गहाळ झालेले ३६ लाख २९ हजार रुपये किमतीचे एकूण १४५ मोबाईलचा शोध घेऊन तक्ररदार नागरिकांना देण्याचे काम केले आहे. १ ते ३० डिसेंबर एक महिन्यात तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे २९ महागडे मोबाईल सायबर पोलिसांच्या मदतीने शोध घेऊन तक्रारदारांना विना बिलंब परत केले आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले.

ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात मोबाईलचे बिल, आधारकार्ड व लेखी अर्ज अशा कागदपत्रसह सांगोला पोलिसात तकार नोंदवावी, असे अवाहन पो. नि. भीमराव खण्दाळे यांनी केले आहे. ही कार्यवाही पोलीस आधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस आधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस आधिकारी विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पो. नि. भीमराव खणदाळे यांच्या मार्गदशानाने पोकॉ. शहाजहान शेख व पोकॉ. रतन जाधव यांनी केले आहे.