बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. या ब्रेकअपच्या अफवांमध्ये मलायका आणि अर्जुनने अनेक वेळा क्रिप्टेड पोस्टही शेअर केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याबाबत उघडपणे अधिकृतपणे भाष्य केले नाही. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा असताना दुसरीकडे मलायका स्पेनमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे. यावेळी तिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मलायका अरोरा ही सध्या स्पेनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्पेनमधील तिच्या चार फोटोंचा कोलाज बनवून शेअर केला आहे. एका फोटोत मिस्ट्री मॅन हातात ज्यूसचा ग्लास घेऊन दिसत आहे. दुसऱ्यामध्ये मलायका निऑन कलरची बिकिनी परिधान करत मस्ती करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये खाद्यपदार्थ दिसत आहे. तिसऱ्या फोटोत व्हाईट कलरचा शर्ट परिधान केलेली व्यक्ती दिसत आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र समोर येताच मलायका प्रेमात असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
ही व्यक्ती कोण आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी मलायकाने केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत होती. मलायकाच्या या पोस्टमुळे तिच्या आणि अर्जुनच्या ब्रेकअपचं कारण सगळ्यांसमोर आल्याचं म्हटले जात होते. तसेच अर्जुनने मलायकाचा विश्वासघात केला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुन कपूरने मागील महिन्यात त्याचा 39 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अर्जुनच्या घरीही जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. पण मलायका अनुपस्थित होती.