महाराष्ट्राचे हे कीर्तिमान स्थापन करण्यात अनेक महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी आपले योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अशा महारत्नांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या या वत्कृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले आहे.
स्पर्धकांनी आपला ५ ते ७ मिनिटांचा व्हिडिओ संस्थेच्या ८६९८८६९८८० या क्रमांकावर whatsapp करावा किंवा prabodhanindia.ngo@gmail.com मेल वर ई-मेल करावा. व्हिडिओ हा महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीच्या उदा.( संत, साहित्यिक, समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, विज्ञान, शिक्षण, कला व क्रीडा, समाजसेवा, समाजकारण ई.) कार्याच्या संदर्भातील असावा. व्हिडिओ बनवताना सेल्फी कॅमेराचा वापर करावा (उभा स्वरूपाचा व्हिडिओ). सुस्पष्ठता. प्रकाश, आवाज ई. गोष्टींची काळजी घ्यावी. स्पर्धा एकूण १०० गुणांची असेल. निवडक व्हिडिओंना प्रसिद्धी दिली जाईल. स्पर्धा एकूण १०० गुणांची असेल.
५०गुण स्पर्धकाच्या व्हिडिओतील आशय आणि सादरीकरणासाठी दिले जातील. तसेच स्पर्धकाचा व्हिडिओ प्रबोधन (Prabodhan) या युट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवर वर प्रकाशित करण्यात येईल. स्पर्धकाच्या व्हिडिओवर मिळालेल्या कमेंट्स, लाईक्स, आणि व्हीव्सच्या आधारे ५० गुण दिले जातील.
सर्व सहभागी स्पर्धकांमधून ५ स्पर्धकांना रोख बक्षीसे देण्यात येतील. पहिला क्रमांकासाठी ११ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये रोख, तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी अनुक्रमे ३ हजार व २ हजार रुपये रोख असे बक्षिसांचे स्वरूप असेल. त्याचप्रमाणे अनेक उत्तेजनार्थ बक्षीसे आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम मुदत अंतिम मुदत २९ एप्रिल, रात्री १२ वाजेपर्यंत आहे.