पीएम किसान सन्मान निधीची रक्कम होऊ शकते १२,००० रुपयांपर्यंत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नाहीत.

यावर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी आणि महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करू शकते. अर्थसंकल्पाशी संबंधित चर्चेची माहिती असलेल्या दोन लोकांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम १२,००० रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देते.