घरफाळा, पाणीपट्टी भरण्याची अट घालण्याची मागणी….

सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच गाजावाजा करत आहे. या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी हे फार्म भरून दिले जात असल्यामुळे महिलांमध्ये समाधान देखील व्यक्त होऊ लागले आहे. अशातच इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये अनेक चर्चांना उधान आले आहे.

म्हणजेच राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना त्या बहिणीच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायत महापालिकेची पाणीपट्टी घरफाळा 100% भरला आहे का याचीही माहिती घ्यावी म्हणजेच कर बूडव्यांना लाभ नको अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीची अनोखी शक्कल सत्यात उतरते का याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.