मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागील काही महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.
तसेच त्यांच्या उपोषणाची सुरुवात ४ जून रोजी म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला कोणताही फायदा होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.