विशाल पाटलांच्या विधानावर विश्वजीत कदम…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना आणल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये लाडके आजोबा, लाडके आजी, लाडकी मुलगी अशा योजना आगामी काळात पहावयास मिळतील. पण या योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरत्याच आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. झोपलेलं सरकार लोकसभा निवडणुकीनंतर जागं होऊन योजना आणतंय.

या योजनेचा सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असेल तर आमचा पाठिंबा आहे. पण योजनेतून जनतेची दिशाभूल होऊ नये, फसवणूक होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असल्याचे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीत आमदार जयंत असंगावकर यांनी आयोजित केलेल्या शाळांना प्रिंटर वाटप या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

दरम्यान याच कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांच्याकडून विश्वजीत कदम यांचा पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला, भावी मुख्यमंत्र्यांसह सांगलीचे पालकमंत्री असा देखील उल्लेख केला, यानंतर विशाल पाटलांच्या विधानावर याची बातमी करू नका नाहीतर सगळं जग राहिलं बाजूला दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल असे म्हणत विश्वजीत कदम यांनी जिल्हास्तरीय राजकरणावर लक्ष वेधले.