धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. मागील काही दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी पातळी कमी झाली होती. अशातच मग जुना पुलावरील वाहतुक सुरु करण्यात आली होती. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बंद केलेला जुना पूल वाहतुकीसाठी मंगळवारी सायंकाळी पाणी पातळी उतरल्याने रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
अशातच कालपासून इचलकरंजीत पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे. काल रात्रभर तसेच सकाळपासून पावसाची संततधार असल्याने पंचगंगा पाणी पातळीत वाढ झालेली पहायला मिळत आहे. इचलकरंजी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आज दुपारी १२ वाजता ५५ फुट ७ इंच इतकी होती. इशारा पातळी ६८ फुट तर धोका पातळी ७१ फुट इतकी पहायला मिळाली. महानगरपालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून पुन्हा जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.