इचलकरंजीत श्री परशुराम जयंती उत्सवाचे आयोजन

उद्या अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. उद्या सोन्या चांदीची खरेदी केली जाते.इचलकरंजी येथे श्री परशुराम जयंती उत्सवानिमित्त शुक्रवार ता. १० मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ९ ते १०.३० धाकटा वाडा येथे श्री पुजा व पवमान अभिषेक, दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा ब्राह्मण सभा कार्यालय येथून सुरू होईल. सायंकाळी ६.३० वाजता श्री परशुराम जन्मकाळ सोहळा, सायंकाळी ७ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम होवून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

हे कार्यक्रम श्री राम | मंदिर येथे होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ब्राह्मण सभा, चित्पावन संघ, श्री परशुराम बहुउद्देशीय सेवा संस्था, ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, वेदपाठ शाळा, श्री समर्थ नागरी पतसंस्था यांनी केले आहे. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.