मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात स्वतः थांबून मुलगा राहुल यांची उमेदवारी जाहीर केलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
अलीकडेच त्यांनी इचलकरंजीसह तीन मतदारसंघांत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून विधानसभा लढवण्याची घोषणा करून महायुतीसमोर पेच निर्माण केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची या कार्यक्रमातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.