गुरु पौर्णिमेला आनंदवार्ता! सोने-चांदीत स्वस्ताई…..

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सोने आणि चांदीत हाराकिरी दिसली. भावात मोठी घसरण झाली. अर्थसंकल्प अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होईल. त्यापूर्वी गेल्या तीन दिवसांत मौल्यवान धातूत घसरण दिसली. चांदीत तर मोठी पडझड झाली. सोन्याचा तोरा पण उतरला. गुरु पौर्णिमेला ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. त्यांना त्यांच्या गुरुंना महागडी भेट वस्तू घेऊन देता येईल. सोन्याने आठवड्याच्या सुरुवातीला पांढरे निशाण फडकवले. त्यानंतर जोरदार मुसंडी मारली. सोने 380 आणि 980 रुपयांची महागाई झाली.

18 जुलै रोजी 160, 19 जुलैला 490 आणि शनिवारी 380 रुपयांनी सोने स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.या महिन्यात चांदीने मोठी मुसंडी मारली. गेल्या आठवड्यासह या आठवड्यात चांदीला चमकदार कामगिरी बजावता आली नाही. आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवसात चांदी 500 रुपयांनी उतरली. तर 17 जुलै रोजी 1 हजारांची मुसंडी मारली. त्यानंतर घसरणीचे सत्र सुरु झाले.

18 जुलै रोजी 1,300 रुपये तर 19 जुलै रोजी 1,450 रुपये आणि शनिवारी 1,750 रुपयांनी चांदी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,240 रुपये, 23 कॅरेट 72,947 रुपये, 22 कॅरेट सोने 67,088 रुपये झाले. 18 कॅरेट 54,930 रुपये, 14 कॅरेट सोने 42,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,983 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.