राजकारणात अनेकजण अखंडत्या करतात मात्र, गेली १० वर्षे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माझे नांव चर्चेत आहे. ते पद मिळाले नाही म्हणून कधी विरोधात प्रतिक्रिया दिली नाही किंवा ना उमेद झालो नाही, असे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. येथील आपटे वाचन मंदिराच्या ५३ व्या वसंत व्याख्यानमालेत ते प्रकट मुलाखतीत बोलत होते.
सुषमा दातार यांनी व्याख्यानमालेचा उद्देश विषद केला. यावेळी आम. राहुल आवाडे यांनी आपटे वाचन मंदिराची दुसरी शाखा काढण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन सभापती शिंदे यांनी दिल्याचे सांगितले. सभापती प्रा. शिंदे यांची अॅड. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी प्रा. शिंदे यांनी माझा राजकारणाशी काही संबंध नव्हता. पण आण्णा डांगे यांच्या भेटीमुळे राजकारणात आलो. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे माझे नेहमीच आदर्श राहिले. मुंडे यांचा संघर्षाचा वारसा मला आहे. त्यामुळे दोनवेळा विधानसभा निवडणूकीत पराभूत होऊनही खचलो नाही. पूर्वी १०० टँकर लागत होते मात्र गेल्या ८ वर्षात एकही टँकर पाणी लागले नाही. भारतीय राजकारणात लोकप्रतिनिधीची सेलिब्रिटी म्हणून क्रेझ आहे आणि ती वाढत आहे. असेही सभापती शिंदे यांनी नमुद केले. सभागृहात अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे, सरकारला उत्तर देण्यास भाग पाडले पाहिजे तरच त्या व्यक्तीचे नाव होते. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, अशोक सौंदत्तीकर, हर्षदा मराठे, माया कुलकर्णी यांच्यासह रसिक उपस्थित होते.