आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर आली आहे. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला पराभूत केल्याने रंगत आणखी वाढणार आहे. मुंबई इंडियन्स क्वॉलिफाय होणं तर शक्य नाही. मात्र दुसऱ्या संघांसाठी तारणहार किंवा मारक ठरणार आहे. तसं पाहिलं आजच्या सामन्यातील विजय हैदराबादसाठी महत्त्वाचा होता. मात्र पराभवामुळे प्लेऑफचं गणित आणखी लांबलं आहे. तसेच इतर संघांना यामुळे बळ मिळालं आहे.
मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजय मिळवून तसा काही फायदा नाही. मात्र गुणतालिकेत सर्वात शेवटी असताना थेट नवव्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात टायटन्सला मात देत नववं स्थान गाठलं आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचं टॉप 4 मध्येच आहे. सनरायझर्स हैदराबादचे 12 गुण असून नेट रनरेटवर फटका बसला आहे. मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून पराभूत केल्याने -0.065 नेट रनरेट इतका झाला आहे. आता उर्वरित तीन सामन्यापैकी दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा प्लेऑफची वाट बिकट होईल आणि इतर संघांना संधी मिळेल.