शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं (Govt) विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्यांच्या फरकाने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो. आतापर्यंत 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, तुम्हाला जर पुढचा 18 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आत्ताच काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. देशातील करोडो शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. शेतकरी 18 वा हप्ता कधी जमा होऊल याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, मिळालेल्य़आ माहितीनुसार पुढील हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. हे काम न केल्यास तुमचा पुढील हप्ता अडकू शकतो. याशिवाय, तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर आजच करा. ही कामे पूर्ण केली तरच तुम्हाला जीएम किसान सन्मान निधीचा पुढचा म्हणजे 18 वा हप्ता मिळेल, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहाल.