कोल्हापूर, सांगलीकरांना दिलासा! कर्नाटकाच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांसमोर असणाऱ्या महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग सव्वा लाखावरून दीड लाख क्युसेक्स करण्यात आला असून या तिन्ही जिल्ह्यांना पुराच्या धोक्यापासून दिलासा मिळणार आहे. पंचगंगा कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातील विसर्ग सातत्याने वाढवला जातोय.

कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु, कोल्हापूरसह सांगली, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेला दिलासा मिळणार आहे.अलमट्टी धरणातून सध्या 80 हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत होता तो आता वाढवण्यात आला आहे. त्यामुळं सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झाला आहे.सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्हांसमोर असणाऱ्या महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेकचा विसर्ग वाढवण्याची मागणी काल कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते.