निलेवाडीच मुख्य दुसरा रस्ताही बंद .….

हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी-अमृतनगर रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने बंद करण्यात आला आहे. यामुळे निलेवाडीला जोडणारा दुसरा रस्ताही बंद झाला आहे. यापूर्वीच निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुल पाण्याखाली गेला आहे.तो या गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे.चांदोली धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस सुरु असल्याने वारणा धरणातून सद्यस्थितीत सूरु असलेल्या ३८०० क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्रद्वारद्वारे ७२१६ क्युसेक आणि विद्युत जनित्रमधून १६५८ क्यूसेक असे एकुण ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

यामुळे वारणा नदीच्या पुराचे पाणी वाढतच आहे.निलेवाडी गावाला वारणा नदीच्या पुराचा पहिला फटका बसतो. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला जोडणारे निलेवाडी खुर्द पूल या अगोदरच बंद झाले आहे. मंगळवारी (दि.23) अमृतनगर- निलेवाडी रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे आता केवळ निलेवाडीसाठी पारगाव-निलेवाडी हा एकमेव मार्ग खुला आहे. काही नागरिकांनी आपल्या जनावरांचे स्थलांतर सुरू केले आहे. पाणी वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आहे.