हातकणंगले मतदारसंघातील विजयाचा गुलाल कोणाला लागणार? उमेदवारांची वाढली धाकधूक

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला पार पडली. उद्या शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. अत्यंत चुरशीने मतदान झालेल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांची धाकधुक वाढली. महविकास आघाडीचे राजूबाबा आवळे, महायुतीचे अशोकराव माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुजित मिणचेकर यांच्यातच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा महासंग्राम रंगला.

प्रचारादरम्यान सर्वच उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांना लोकांनी गर्दी केली. यामुळे अचुक अंदाज कोणालाही घेता आला  नाही. या तिघाही दिग्गज उमेदवारांनी आपल्यालाच गुलाल लागणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारराजाच्या मनात काय लपलाय हे २३ तारखेस स्पष्ट होईल. तोपर्यंत चाचपण्या करून फक्त अंदाज बांधण्याचे काम चालु आहे.

राज्यामध्ये वेगवेगळ्या वृत वाहिन्यांचे एक्झिट पोल सताधाच्यांच्या बाजूने दिले जात असले तरी लोकसभेला लोकांनी सर्वांचे अंदाज हवामान खात्याच्या अंदाजा सारखे ठरविले होते मतदारही सुज्ञ झाला असल्याने त्याने कोणालाच आपला नेमका अंदाज येऊ दिला नाही. यामुळे याही वेळी या मतदारसंघात यापेक्षा वेगळे चित्र पहायला मिळेल असे वाटत नाही. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक लक्षवेधी घडामोडी या मतदारसंघात घडल्या.

या निवडणुकीच्या निमित्ताने दोन आवळे घराण्यांची दुसरी आणि तिसरी पिढी सुद्धा एकत्र आली. राजूबाबा आवळे यांच्या दोन्ही घराण्यांनी मिळून प्रचार केला. माजी आमदार राजीव आवळे यांना मानणारा सर्व समाजात एक वर्ग आहे तोही एक दिलाने रावला. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. यातून राजूबाबांना बळ मिळाले. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे शिवसेनेच्या धनुष्य बाणावर दोन वेळा निवडून आले. गत निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. शिवसेनेच्या विभाजनानंतर राज्यात महाविकास आघाडी उद्याला आली आणि वरिष्ठांच्या धोरणानुसार हि जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. यामुळे मिणचेकरांनी शेतकरी संघटनेची शिट्टी हातात घेतली .

माजी खासदार राजू शेट्टी यानी वैभव कांबळे सारख्या चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून त्यांना उमेदवारी दिली. यातून त्यांच्यावर बरेच आरोपही झाले. मिणचेकर यांना माणणारा शिवसेनेत एक गट आहे. त्यांना शेतकरी संघटनेचे पाठबळ मिळाल्याने त्यानीही प्रचारात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि निवडणुकीत चांगलीच रंगत भरली. यामुळे तेही गुलालाच्या स्पर्धेत आहेत.

अशोकराव माने यांनी गेली निवडणूक फक्त जनसुराज्य पक्षाच्या बळावर लढवली होती. यावेळी ते महायुतीचे उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटयाला हि जागा गेली असली तरी भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या आमदार विनय कोरे यांनी स्वतःच्या ताकदीवर जनसुराज्य पक्षासाठी हि जागा घेऊन अशोकराव माने यांना उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीमागे महायुतीची ताकद उभा केली. आवाडे, महादेवराव महाडीक आणि तसेच जिल्हा परिषदेचे जेष्ठ नेते अरुणराव इंगवले यांची ताकद अशोकराव माने यांच्या पाठीशी राहिली. 

या निवडणुकीत विजयाचा गुलाल कोणाला लागणार हे गुपीत एव्हिएम मशीन मध्ये बंदोबस्तात आहे. २३ तारखेस मतमोजणी झाल्यावर ते स्पष्ट होईल तोपर्यंत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सर्वच उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. कार्यकर्ते आपलाच विजय कसा होईल हे नेत्याना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.