हुपरी शहराला अमृत दोन योजनेतून दूधगंगा नदीवरून पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. यासाठी 46.50 कोटींचा निधी मंजूर देखील झालेला आहे अशी माहिती नगराध्यक्ष जयश्री गाट यांनी दिली.
या योजनेला वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे सहकार्य मिळालेले आहे. हुपरी नगरपालिका अंतर्गत वाढीव लोकसंख्येची दखल घेऊन या योजनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून तांत्रिक सल्लागार मार्फत योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सादर करण्यात आलेली होती.
यासाठी महावीर गाट, अमित गाट यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व इतर पदाधिकारी यांच्यामार्फत पाठपुरावा केल्यामुळे ही योजना तांत्रिक दृष्ट्या पूर्णत्वास आलेली आहे.