पावसाळ्यात भजी खाऊन कंटाळा आला असेल तर कटलेटच्या रेसिपी करा ट्राय

चीज आणि कॉर्न कटलेट

साहित्य

कॉर्न – 1 कप (वाफवून घेतलेले)
चीज- 1 कप (किसलेले)
बटाटे- 2 (उकडून मॅश केलेले)
कांदा- 1 (बारीक चिरलेला)
कोथिंबीर- 1/2 कप (चिरलेली)
धने पावडर- 1 चमचा
जिरे पावडर – 1 चमचा
तिखट -1/2 चमचा
मीठ – चवीनुसार
ब्रेड क्रम्स- 1 कप
तेल- तळण्यासाठी

कृती
सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये उकडलेले कॉर्न आणि किसलेलं चीज उकडलेले बटाटे, कांदे, कोथिंबीर, धने पावडर,जिरे पावडर, तिखट आणि मीठ टाका. या सगळ्या गोष्टी नीट मिक्स करा. या मिश्रणाचे गोळे तयार करुन त्याला कटलेटचा आकार द्या. कटलेटला ब्रेड क्रम्स लावून घ्या. गरम तेलामध्ये कटलेट सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. कुरकुरीत कटलेट चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

बीन्स आणि कॅरट कटलेट

साहित्य

हिरवे बीन्स- 1 कप (कापून वाफवून घेतलेले)
गाजर- 1 कप (बारीक किसलेले)
बटाटे- 2 (उकडून मॅश केलेले)
कांदा -1 (बारीक चिरलेला)
हिरव्या मिरच्या- 2 (बारीक चिरलेल्या)
जिरे पावडर- 1 चमचा
धने पावडर- 1 चमचा
हळद- 1/2 चमचा
मीठ – चवीनुसार
ब्रेड क्रम्स- 1 कप
तेल – तळण्यासाठी

कृती

सगळ्यात आधी एका भांड्यात उकडलेले बीन्स, गाजर, बटाटे, हिरवी मिरची, जिरे पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ नीट मिक्स करुन घ्या. या मिश्रणाचे गोळे बनवून त्याला कटलेटचा आकार द्या. ब्रेड क्रम्स लावून कटलेट तेलात तळा. सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत कटलेट तळा. हिरवी चटणी किंवा सॉससोबत खा.