गोल बेसनाचा लाडू, तोंडात टाकताच विरघळेल; रेसिपी पाहा

दिवाळीच्या फराळात गोडाशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय फराळही पूर्ण होत नाही. परंतु, फराळ बनवताना एखादा पदार्थ चुकला की, आपण तो पुन्हा बनवण्याच्या भानगडीत पडत नाही.

बेसनाच्या लाडूवर लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकांचा विशेष प्रेम असते. खमंग भाजल्यानंतर लाडूची टेस्ट आणखी चवदार होते. परंतु बनवताना आपण अशा अनेक चुका करतो की, बेसनाची भाजणी कच्ची राहाते, लाडू वळत नाही किंवा तो अधिक कडक बनतो. काही चुका टाळल्यानंतर हा लाडू एकदम दाणेदार, गोल आणि परफेक्ट बनेल, पाहूया रेसिपी .

1. साहित्य | Ingredients

  • चण्याची डाळ 500 ग्रॅम |
  • साजूक तूप 150-200 ग्रॅम |
  • पिठी साखर 400 ग्रॅम |
  • वेलची पूड ½ चमचा |
  • पिस्ते |
  • बेदाणे |

2. कृती

  • लाडू बनवण्यापूर्वी चण्याची डाळ कढईत मंद आचेवर १० ते १२ मिनिटे चांगली भाजून घ्या. थंड झाल्यानंतर रवाळ पीठ दळून आणा.
  • त्यानंतर गोल तळाच्या कढईत थोडसे तूप घालून गरम करा. त्यात बेसनाचे पीठ घाला. बेसन थोडे भाजल्यानंतर पुन्हा दोन चमचे तूप घाला.
  • पुन्हा व्यवस्थित बेसन भाजून घ्या, पुन्हा उरलेले सगळे तुप बेसनात घाला. २० मिनिटे किमान बेसन भाजून घ्या. तूप कमी पडल्यावर १ चमचा तूप घाला.
  • बेसन चांगले भाजल्यानंतर तूप सोडायला सुरुवात करेल. रंगबदलेपर्यंत पुन्हा थोड भाजून घ्या. साधारणत: २ चमचे दूध घालून परतून घ्या.
  • तयार बेसनाचे सारण ताटात काढून थोडे थंड होऊ द्या. पुन्हा हाताने एकजीव करुन घ्या.
  • मळलेल्या बेसनात पीठी साखर घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर लाडू वळायला घ्या. वरुन बेदाणे लावा.
  • तयार होईल गोल गरगरीत दाणेदार एकदम परफेक्ट बेसनाचा लाडू