आगामी विधानसभा निवडणूक पाहता राज्यसरकारने सर्वसामान्यांसाठी योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. त्यातून आता राज्य सरकारने ”मुख्यमंत्री वयोश्री योजने”ची घोषणा केली आहे.राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन: स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र उपलब्ध करणे. मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना 3000 रूपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
कागदपत्रे
आधारकार्ड/ मतदान कार्ड
पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स
स्वयं-घोषणाफत्र
शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.
योजनेचे निकष
31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावीत.
आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डची पावती देखील चालणार आहे.
आधारकार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असावे.
लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.
लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.
अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मची लिंक क्लिक करा. हा फॉर्म योग्य रित्या भरून. ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सबमिट करा.फॉर्ममध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहाव लागेल. तुमचं वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील भरायचे आहेत.यासोबत लिंग, जात आणि प्रवर्ग, मोबाईल क्रमांक आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (कमाल ₹2,00,000) भरायचे आहे.
तुम्ही मागील तीन वर्षांत कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही, याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे. हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे आहे. फॉर्म मध्ये हे देखील जागा दिलेली आहे आणि भरणे अनिवार्य आहे. दरम्यान फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा. या फॉर्ममध्ये तपशील अचूक भरणे आवश्यक आहे, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.