कोल्हापुरचा नेमबाज स्वप्निल कुसाळेची नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी!

भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळालं आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरच्या नेमबाज स्वप्निल कुसाळे याने नेमबाजीत कांस्य पदक मिळवून दिलं आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचला आहे. स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात 1 ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलं आहे.

भारतासाठी स्वप्निलने या 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. स्वप्नील कुसळेची अप्रतिम कामगिरी! स्वप्निलचं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे. कारण त्याने कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने   भरलेला आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे.