कडक पोलीस बंदोबस्तात सरपंच आरक्षण जाहीर; फेर आरक्षणाचा फटका
हातकणंगले, हातकणंगले तालुक्यातील २०२५ ते २०३० कालावधीत होणाऱ्या निवडणुकीच्या सरपंच पदाच्या फेरआरक्षणाची सोडत सोमवारी दुपारी साडे बारा वाजता हातकणंगले तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण १२ जागा असून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३२ जागा देण्यात आल्या. या प्रत्येक आरक्षणामध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण देण्यात आले आहे.
हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत करण्यात आली यावेळी नायव तहसीलदार संदीप चव्हाण माधय इगवे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
फेरआरक्षणा वेळी नवीन तेरा बदल दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने बाहार तर्फे वडगाव हे पूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये समाविष्ट असलेले गाव सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गामध्ये समाविष्ट झाले. तर मुडशिंगी हे गाव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीमध्ये नव्याने समाविष्ट झाले. याचबरोबर अनुसूचित जातीसाठी पूर्वीच्या आरक्षणामध्ये चार बदल झाले आहेत.यामध्ये कासारवाडी व कापूरवाडी ही गावे अनुसूचित जाती सर्वसाधारणमध्ये समाविष्ट होतील. ती आता अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गात समाविष्ट केली. तसेच जंगमवाडी व निलेवाडी ही गावे पूर्वी अनुसूचित स्त्री प्रवर्गासाठी राखीव होती ती अनुसूचित जाती सर्वसाधारण करण्यात आली. याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्येही पाच बदल करण्यात आले आहेत. यातील वाठार तर्फे वडगाव हे गाव सर्वसाधारण स्त्रीमध्ये समाविष्ट झाले आहे. या ऐवजी मुडशिंगी हे नवीन गाव या प्रवर्गात समाविष्ट झाले आहे. पूर्वी इंगळी हे गाव नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये समाविष्ट होते. त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षण देण्यात आले आहे. तसेच तळसंदगे किणी ही गावे पूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीमध्ये समाविष्ट होती. या ठिकाणी नव्याने नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षण देण्यात आले आहे. याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गामध्ये देखील पाच बदल घडले आहेत. पूर्वी रेंदाळ, रुई ही गावे सर्वसाधारण गटात होती ती आता स्त्री प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे. याचबरोबर कबनूर, हालोंडी ही गावे पूर्वी सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव होती ती आता सर्वसाधारण झाली आहेत. तसेच सर्वसाधारण गटामध्ये वाठार तर्फे वडगाव (स्त्री) या नवीन गावाचा समावेश झाला आहे. त्यामुळे आरक्षणावेळी तेरा बदल दिसून आले आहेत.
फेर आरक्षण पुढीलप्रमाणे अनुसुचित जाती प्रवर्ग : बिरदेववाडी, लक्ष्मीवाडी, निलवाडी,
जंगमवाडी, संभापूर, माणगांववाडी अनु. जाती, महिला आरक्षित अंबपवाडी, माणगांव,कापुरवाडी अतिग्रे, सोनाली, कासारवाडी,
अनु. जमाती स्त्री हिंगणगांव नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) १६ गांवे ८ स्त्रीयांसाठी ८ सर्वसाधारण
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री कोरोची, जुने पारगांव, तिळवणी, मनपाडळे, साजणी, आळते, इंगळी, मुडशिंगी
नागरिकांचा मागास प्रवर्ग पट्टणकोडोली, रुकडी, किणी, तळंदगे, पाडळी, रांगोळी, नवे पारगांव, शिरोली
सर्वसाधारण एकूण ३२ गावे सर्वसाधारण स्त्री खोतवाडी, टोप, रुई, तळदे, लाटवडे, रेंदाळ, रुई, हरले, चोकाक, खोची, चावरे,सावर्डे, यळगुड, माले, तासगांव, वाठार तर्फ वडगांव
सर्वसाधारण : हालोंडी, नागांव, भेंडवडे, तारदाळ, चंदूर, घुणकी, दुर्वगेडी, कबनूर, वाठार तर्फ उदगांव, कुंभोज, मजले, भादोले, नरंदे, मौजे वडगांव मिणचे, अंबप,
