इचलकरंजी पूरग्रस्तांसाठी रवींद्र माने यांनी दिला मदतीचा हात….

सध्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. कोल्हापूर सांगली या ठिकाणी अनेक नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात रवींद्र माने यांनी दिलेला आहे. रवींद्र माने यांनी बांधकाम सभापती असताना सुद्धा इचलकरंजी नगरसेवक असताना सुद्धा भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी आजवर काम केले आहे.

इचलकरंजी शहरातील गावभाग परिसर, लक्ष्मी मंदिर, दत्त शेळके मळा, अष्टविनायक कॉलनी, मुजावर पट्टी नदीवेस नाका याआधी भागाला महापुराचा फटका बसलां आहे. हजारो नागरिकांच्या घरात महापुराचे पाणी आल्यामुळे छावणीमध्ये जाऊन त्यांना राहावे लागत आहे. त्यांच्या खाण्यापण्याची व्यवस्था महापालिकेद्वारे केली जाते. पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी गेल्या आठ दिवसापासून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिलेला आहे .

त्यांना चहा नाश्ता जेवण ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तसेच चारा छावणीमध्ये असणाऱ्या जनावरांनाही चारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र माने यांनी काम सुरू केले.

मुख्यमंत्री सहायता निधीतून गोरगरीब जनतेला लाखो निधी मंजूर करून देण्यात आला. त्याचाही गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळालाय. गोरगरिबांचा आशीर्वाद रवींद्र माने यांना सध्या लाभत आहे. पूर्वग्रस्त नागरिकांना एक मायेचा आधार रवींद्र माने यांनी दिलेला आहे. त्यांची एक वेगळीच ओळख इचलकरंजी शहरामध्ये होत आहे.