राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत. लाडकी बहिण योजनेची घोषणा झाल्यापासून दररोज हजारोंच्या संख्येने महिला अर्ज भरत आहेत. दररोज साधारण 70 ते 80 हजार महिला अर्ज करत आहेत. आता या अर्जदार महिलांची संख्या 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 च्या घरात पोहोचली आहे.
तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत अॅप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल.
जर तुम्हाला अर्जात स्टेटस Approved असे दाखवत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
Pending for Approval
आपल्या अर्जात असा पर्यंत दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल.
ज्या महिलांचे नाव या यादीत येणार नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.