बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर अर्ज करावेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2024 आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील या नोकरीसाठी तुम्ही या centralbankofindia.co.in वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्या असावे. या नोकरीसाठी पदारनुसार पात्रता बदलली जात आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 ते 40 वर्ष असणे गरजेचे आहे. ही वयोमर्यादा देखील पदांनुसार बदलते.
अर्ज कसा करावा
- नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी centralbankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर रिक्रुटमेंट वर क्लिक करा.
- त्यानंतर अर्जाच्या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर Click here for new Registration वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही इतर माहिती फोटोग्राफ आणि सही अपलोड करा.
- तुम्ही शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करू शकता.
- या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरायचे आहे.