हिवाळ्यात ‘खा’ हे लाडू, शरीराला उबदार ठेवण्यासोबतच वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती

हिवाळ्याच्या काळात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. या ऋतूमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींबाबत अत्यंत काळजी घ्यावी लागते. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि सर्दी, खोकल्या यासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी दररोज हिवाळ्यातील विशेष लाडूंचे सेवन करावे. हे हिवाळ्यातील खास लाडू शरीराला ऊब देतील. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. या हिवाळ्यात तुम्ही हे लाडू करू शकता. जे केवळ आरोग्यदायीच नाही तर अतिशय चवदार आहेत.

डिंकाचे लाडू

डिंकाच्या लाडू मध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. जे हाडे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. कॅल्शियम, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंटने भरपूर डिंकाचे लाडू हिवाळ्यासाठी योग्य पर्याय आहेत. हे करण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता आणि मखाना तुपात तळून घ्या आणि थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या. यानंतर तुपामध्ये डिंक टाका आणि डिंक फुगेपर्यंत तळून घ्या. थंड झाल्यानंतर बारीक करा. गव्हाचे पीठ तुपात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि थोडे थंड झाल्यावर त्यात भरड ड्रायफ्रुईट्स पावडर, सुंठ पावडर, डिंक, पिठीसाखर आणि तूप घालून चांगलं मिक्स करून लाडूचा आकार द्या. हे लाडू आरोग्यासाठी उत्तम आहेच पण चवीलाही हे लाडू अप्रतिम आहेत.

ड्रायफ्रूट्सचे लाडू

हिवाळ्यात गरम अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. हिवाळ्यामध्ये सूकामेवा नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि मानसिक समस्यांमध्येही ते फायदेशीर ठरू शकते. हे लाडू बनवणे अगदी सोपे आहे. काजू, बदाम आणि अक्रोडचे छोटे छोटे तुकडे करून तुपात तळून घ्या. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास लाडू मध्ये खोबरे आणि दाणेही घालू शकतात. यानंतर खजूर मधले बी काढून खजुरची पेस्ट तुपात तळून घ्या. खजुराच्या पेस्टमध्ये भाजलेल्या ड्रायफ्रूट घाला. ते मिक्स करा आणि लहान लाडू तयार करा.

तिळगुळाचे लाडू

तीळ आणि गुळ दोन्ही शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. हिवाळ्यात तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हाडे मजबूत होतात. तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम तीळ मंद आचेवर हलकी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. एका पातेल्यात गुळात पाणी घालून पाक तयार करण्यासाठी ठेवा. भाजलेले तीळ साखरेच्या पाकात टाकून चांगले मिक्स करा आणि त्याचे छोटे लाडू बनवा. या लाडू मूळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत होईल.