आजपासून मोफत स्त्रीरोग निदान शिबिर सुरू

वाळवा तालुक्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयात आज सोमवार दि. ५ व ६ ऑगस्ट रोजी मोफत स्त्रीरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केल्याची माहिती संचालक डॉ. ए. आर. व्ही. मूर्ती व प्राचार्य डॉ. अमित पेठकर यांनी दिली. स्त्रीरोग प्रसूतीतंत्र विभागाच्यावतीने ५ व ६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या कालावधीत मोफत स्त्रीरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरामध्ये स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत तक्रारी, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे, मासिक पाळीत ओटीपोटात तीव्र वेदना होणे, स्त्री वंध्यत्व, रजोनिवृत्तीतील समस्या अशा सर्व तक्रारींवर विना शस्त्रक्रिया मोफत आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या स्त्रियांची मोफत रक्त तपासणी करण्यात येणार आहे.