मिरज लोकसभेत विरोधात गेलेल्या मिरजेतील माजी नगरसेवकांना आपलेसे करण्यासाठी जयंत पाटलांनी व्यूव्हरचना सुरु केली आहे. माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या फार्म हाऊसवर भोजनाच्यानिमित्ताने एकत्र येत त्यांनी सर्वांना सोबत येण्याचे आवाहन केले. विशाल पाटील, विश्वजीत कदम हे शेवटी महाविकास आघाडीतच आहेत. झालं गेलं विसरुन जाऊ, आणि आता विधानसभेला राष्ट्रवादीची शिट महाविकास आघाडीतून मिरजेतून निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करु अशी चर्चा झाल्याचे खात्रीलायक कळते.
यावेळी शिवाजी दुर्वे, हुलवान व मिरजेतील काही माजी नगरसेवक उपस्थित होते. जेवणाचा आस्वाद
घेताना जयंत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि आपण एकत्र काम केले पाहिजे पुढील वेळेस जास्त संख्येने उपस्थित रहावे यासाठी मैनुद्दीन बागवान यांच्याकडे नेतृत्व दिल्याने आता मिरज पॅटर्न नक्की कुणाकडे? अशी चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील हे मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार करत होते परंतु मैनुद्दीन बागवान हे मात्र विरोधात होते. त्यामुळे त्यावेळी सुध्दा मैनुद्दीन बागवान यांनी जयंत पाटलांची परवानगी घेवूनच धोरण ठरवले हाते का? अशीही चर्चा सुरु आहे. दरम्यान आगामी काळात मिरज पॅटर्न नक्की कुणाच्या मागे उभा राहतो, हे लवकरच कळेल.