आजपासून कोरोची ग्रामपंचायतीतर्फे जप्तीची मोहीम

कोरोची गावची लोकसंख्या ५५ ते ५६ हजाराच्या वरती असून गावचा विकास तसेच जलस्वराज पाणी योजना चालवण्यासाठी मुश्किलीचे बनले आहे. घरफाळा दीड कोटी रुपये थकीत आहे तर पाणीपट्टी ८० लाख रुपये थकीत असल्याने सदरची योजना चालवणे कठीण बनले आहे. जलस्वराज पाणी योजना चालवण्यासाठी टीसीएल तुरटी तसेच कर्मचारी पगार व लाईट बिल यासाठी महिना १० लाख रुपये लागतात तरच ही योजना चांगल्या पद्धतीने चालते.

कोरोची येथील कोरोची ग्रामपंचायतीतर्फे मंगळवारी ६ ऑगस्टपासून घरफाळा व पाणीपट्टीविषयी जप्तीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉ. संतोष भोरे व ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांनी केले आहे. कोरोची ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी थकित घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करावे अन्यथा जप्तीची मोहीम राबवण्यात येणार असून थकबाकीदारांना या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.